भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारीं असतां जीवन्मुक्त आह्मी । विठ्ठल हे नामीं वि-नटलें

sansarin asatan jivanmukta ahmi | viththal he namin vi-natalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसारीं असतां जीवन्मुक्त आह्मी । विठ्ठल हे नामीं वि-नटलें ॥१॥ काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडणें दाही दिशा ॥२॥ कोव वाहे मंत्र वाउगी खटपट । गाऊं निष्कपट रामनाम ॥३॥ नामा ह्मणे मज आहे हा भरंवसा । मना तूम विश्वासा दृढ धरी ॥४॥