भजनी मालिका

भजने

संसार करितां देव जैं सांपडे । तरि कां झाले वेडे सन-कादिक ॥१॥ संसारीं असतां जरी भेटता । शुकदेव कासया जाता तयालागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसार परजनीं । दूर दिधलें मज साजणी । द्वारकापुर पाटणीं । माझें माहियेर ॥१॥ थोर उत्कंठा मनीं । वाट पाहें प्रतिदिनीं । मज नेत कां न कोणी । तया माहियेरा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसार पसर करिसी तळमळ । कां रे घननीळ नाठवीसी ॥१॥ पुत्रदाराधन कवण हे कवणाचे । आहे तोंवरी माझें माझें म्हणती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संसार पाल्हाळ सांगती परिकर । नामपाठ सार सिद्धवरी ॥१॥ न करी आळस नामपाठ गातां । तुटे भवचितां नाना व्याधीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संसार पाल्हाळ सांगसी परिकर । नाम तें श्रीधर न म्हणसी ॥१॥ कैसें तुज उद्धरण होईल गव्हारा । भजन त्या हरीहरी करी वेगीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसार शेत सुलभ थोर भूमी वाहिलीं नवही द्वारें । पांचही आउतें मेळवुनी तेथें जुंपियेली दोन्ही ढोरें । उखीतें करी येति जाती भारि नव्हती कोण्हि स्थिरें । बुनादि शेत वाहिलें तें काय सांगूं अपाररे ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

संसार सागरींरे । माझें माहेर पंढरपुरीं ॥ विठोबा बाप माझा । माता रखुमाई सुंदरी ॥१॥ पुंडलिक भाऊ माझा । तोही नांदे बरव्यापरी ॥ सासुरें दुर्बळ भारी । मज मोकलिलें दुरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसार हा तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥१॥ शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होउनि ठेला ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारकूपीं हरि पडियेलों श्रीहरीं लाहुनी पैं शरीर । एका पिसें लागे कांहींएक न करवें पंचभूतिक विकार । सुष्ट दुष्ट कर्में करितां हे शिणलें मळमुत्र दोष जर्जर । ऐसिया जीवातें उद्धरसी म्हणोनी दोष जर्जर ।

रचनाकार: संत एकनाथ