भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आम्ही या कीर्तनें शुद्ध झालों

sansarache angin avaghin cha vesanen | amhi ya kirtanen shuddha jhalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आम्ही या कीर्तनें शुद्ध झालों ॥१॥ आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥ ब्रम्हपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥२॥ तुका म्हणे आम्हां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रम्हरस सेवूं सदा ॥३॥