भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म

sansarachya nanven ghaluniyan shunya | vadhata ha punya kela dharma

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥ हरीभजनें हें धविळलें जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥ध्रु.॥ कोणां ही नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी ॥२॥ तुका म्हणे सुख समाधि हरीकथा । नेणें भव्यकथा गाईल तो ॥३॥