भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारासाठी निघाली हा हा

sansarasathi nighali ha ha

रचनाकार: संत बोधले · अभंग
संसारासाठी निघाली हा हा । तमाशा पाहिला मोठा रे ॥ १॥ होता संचिताचा विक्रा केला । सर्वही आटला पोटा रे ॥ २ ॥ असत्याचे माप टाकुनी देई । सांडी हरी विक्राई खोटी रे ॥३॥ सत्याची तागडी धरून हाती । बसी मुक्ती चौहाटा हे ॥४॥ नामाचे केणे भरी तोचि भला । अभागी चुकला करंटा रे ॥५॥ विठोबा पाहुणा जोड झाली बरी । मोकळ्या चारी वाटा रे ॥६॥ बोधला म्हणे आम्हा थोर लाभ झाला । हाकारिल्या चारी पेठा रे ॥७॥