भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराबंधन केलें जेणें शून्य । तयासी अनन्य शरण रिघा

sansarabandhan kelen jenen shunya | tayasi ananya sharan righa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसाराबंधन केलें जेणें शून्य । तयासी अनन्य शरण रिघा ॥१॥ मायबाप सखा विठ्ठल विसांवा । त्याचे पायीं ठेवा सदा मन ॥२॥ निजरूपबोध तोचि ज्ञानदीप । आन्मदस्वरूप बाप माझा ॥३॥ नामा ह्मणे त्याच्या संगतीचा वारा । पावे पैल पारा हेळामात्रें ॥४॥