भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारी निधान लाधले जनां सद्गुरुचरणा सेवीं बापा

sansari nidhan ladhale janan sadgurucharana sevin bapa

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
संसारी निधान लाधले जनां सद्गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥ कायावाचामनें तयास देवावीं । वस्तु मागून घ्यावी अगोचर ॥ २॥ तें गोचर नव्हे जाण गुरुकृपेवीण एन्हवीं तें आपणामाजीं आहे॥३॥ असतां सम्यक परि जना चुकामुक । भुलली निष्टंक मंत्रतंत्रें ॥ ४॥ माळं वेष्टण करी टापोर घेत शिरीं नेम अष्टोत्तरीं करिताती ॥५॥ जो माळ करविता वाचेसि वदविता । तथा हृदयस्था नेणे कोणी ।।६।। सोहं आत्मा प्रगट जो दाखवी वाट! सद्गुरु वरिष्ठ तोचि जाणा ||७|| तया उत्तीर्णता व्हावया पदार्था न देखों सर्वथा जनी म्हणे ॥८॥