भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारीं निधान लाधलें जनां । सद्‌गुरुचरणा सेवीं बापा

sansarin nidhan ladhalen janan | sad‌gurucharana sevin bapa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसारीं निधान लाधलें जनां । सद्‌गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥ कायावाचामनें तयास देवात्रीं । वस्तु माणून ध्यावी अगोचर ॥२॥ तें गोचर नव्हे जाण गुरुकृपेवीण । एर्‍हवी तें आपणा माजी आहे ॥३॥ असतां सम्यक परि जना चुकामुक । भुललीं निष्टंक मंत्रतंत्रें ॥४॥ माळ वेष्टण करीं टापोर घेती शिरीं । नेम अष्टोत्तरीं करिताती ॥५॥ जो माळ करविता वाचेसि वदविता । तया ह्रदयस्था नेणे कोणी ॥६॥ सोहं आत्मा प्रगट जो दाखवी वाट । सद्रुरु वरिष्ठ तोचि जाणा ॥७॥ तया उत्तीर्णता व्हावया पदार्था । न देखों सर्वथा जनी म्हणे ॥८॥