भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारार्चे दु:खसुख ह्मणों नये । पुढें दु:ख पाहे अ-निवार

sansararche du:khasukh hmanon naye | pudhen du:kha pahe a-nivar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसारार्चे दु:खसुख ह्मणों नये । पुढें दु:ख पाहे अ-निवार ॥१॥ तया दु:खा नाही अतपार जाणा । काळाची यातना बहुतांपरी ॥२॥ संसाराची चिता वाहतं जन्म गेला । सोस हा वाढला बहुतांपरी ॥३॥ हित ही बुडालें परत्र दुणावलें । नरदेह बुडविलें भजनाविण ॥४॥ भजनाचा प्रताप दु:ख दुरी जाय । जैसें आश्र होय देशधडी ॥५॥ वायूच्या झुंझाटें वृक्ष उन्मळती । परी माना गति तैसें दु:ख ॥६॥ नामा म्हणे नाम दु:खाचा परिहार । सुखाचा अनिवार पार नाहीं ॥७॥