भजनी मालिका

भजने

संतोषाकारणें सज्जन जीवासी । साहाकारी होसी ना-रायणा ॥१॥ समान करिसी सर्वाभूतीं जाण । पतीत पावन भाक तुझी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनीं लावी बाळा ॥१॥ तैसे परिमळाचें अवघें चि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सत्ताबळें येतो मागतां विभाग । लावावया लाग निमित्य करूं ॥१॥ तुझीं ऐसीं मुखें करूं उच्चारण । बोलें नारायण सांपडवूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सत्तेचें भोजन समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी॥१॥ वर्में श्रम नेला जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग झाला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सत्त्व रज तम गेले निरसोनी । दृश्याची लावणी कैशी झाली ॥१॥ गेलिआ माघारीं पाहतां न दिसे । स्वतः तो प्रकाशे सदोदित ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सत्त्वरजतमें असे हें बांधिलें । शरीर द्दढ झालें अहंकारें ॥१॥ सांडीं अहंकार धरीं द्दढभाव । ह्रदयीं पंढरिराव धरोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सत्त्वरजतमें असे हैं बांधिलें। शरीर दृढ झाले अहंकारें ।।१।। सांडीं अहंकार धरीं दृढभाव हृदयीं पंढरिराय धरोनियां ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

सत्त्वाचा सागर राजा हरिश्चंद्र । स्वप्नीं हें समग्र दिलें राज्य ॥१॥ ब्राह्मणासी सुवर्ण औटभार । संकल्प हा त्वरें सोडियेला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सत्पद तें ब्रह्मा चित्पद तें माया । आनंद पदीं जया म्हणती हरी ॥१॥ सप्त्द निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सत्य असत्य दोनीं देहींच भासत । तेणेंचि नासत सर्व काम ॥१॥ एकासी वंदावें एकासी निंदावें । ऐसिया भावा काय सत्य तें मानावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ