भजनी मालिका
← भजनांकडे परत

सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं

satichen ten ghetan van | bahu kathin parinamin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥१॥ जिवासाटीं गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हे ॥ध्रु.॥ जरि होय उघडी दृष्टि । तरि गोष्टी युद्धाच्या ॥२॥ तुका म्हणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥३॥