भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्त्व रज तम त्रिगुण तें ब्रह्म

sattva raj tam trigun ten brahma

सत्त्व रज तम त्रिगुण तें ब्रह्म । अर्धमात्रा नि:सीम ॐकार हा ॥१॥ सहज हा प्रणव सर्वातीत साजे । मीपणास तेथ ठाव नाहीं ॥२॥ अक्षर कूटस्थ सर्वातीत असे । अक्षर अविनाश ऐसें जाणा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सर्वाचे शेवटीं । अविनाश दृष्टी असे कीं रे ॥४॥