भजनी मालिका

भजने

सदा सर्वकाळ नाम मुखीं गाये । आणीक तें नये दुजा हेत ॥१॥ धन्य त्याची माय पावन तें कुळ । धन्य तो निर्मळ वंश त्याचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सदा सर्वकाळ बाइलेचा दास । होउनी कामास श्वान जैसा ॥१॥ नेणे भीड कधीं मर्यादा स्वजनीं । बाइलेचे कानीं गुज सांगें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सदा सर्वकाळ मनीं वसे देव । तेथें नाहीं भेव कळिकाळाचा ॥१॥ काळ तो पुढरी जोडितसे हात । मुखीं नाम गात तयापुढें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझें कारणीं देह माझा । पडावा उपेक्षू नको गूणवंता अनंता रघूनायका मागणें हें चि आतां ।

रचनाकार: संत रामदास

सदा सुरवर सुख तें इच्छिती । ऐसा लक्ष्मीपती कां रें न भजा ॥१॥ सोइरा धाइरा आन दुजा नाहीं । गुरु पिता पाहीं हाचि बंधु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सदा सोमवारीं विभूति लावूनि शिरीं । तुमच्या मं-दिरीं आलाप करीं ॥१॥ शंकर त्रिपुरारी हरि उच्चारी । म्हणती षडाक्षरी पावें मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सदाचा हा धाला सदाचा भुकेला । सदाचा निजेला जागा सदा ॥१॥ ऐसिये परिचा अंबुला साजणी । वरिला सुवासिणी सदाचि मी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सदाशिवापुढें कोण अनुष्ठानी । अष्टांग लावूनि नमस्कारी ॥१॥ नाम यज्ञ जप ऋषीश्वर ध्याती । शीतळ ते होती काळकूट ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥१॥ आतां नको मज खोटयानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे । भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदीं विठ्ठल वाचा । त्यांसी कैचा संसार ॥१॥ दोष पळाले पळाले। पैल आले हरीदास ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सदोदित मना निवृत्तीचे पायीं । मना आणिक ठायीं जाऊं नको ॥१॥ जपतप काहीं न करीं साधन । तुटेल बंधन निवृत्तिनामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ