भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्त्व रज तम प्रकृती अपारा

sattva raj tam prakruti apara

सत्त्व रज तम प्रकृती अपारा । याहि भिन्न प्रकारा हरी रया ॥१॥ दिसोनि न दिसे लोकीं व्यापारी । घटमठ चार्‍ही हरी व्याप्त ॥२॥ स्वानुभवें धरी अनुभवें वाट । तंव अवचित बोभाट पुढें मागें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे न कळे याची लीला । ते निवृत्तीनें डोळां दाविली मज ॥४॥