भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्तेचें भोजन समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी

sattechen bhojan samayin atude | sevan hi ghade ruchinesi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्तेचें भोजन समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी॥१॥ वर्में श्रम नेला जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग झाला ॥ध्रु.॥ कोथळीस जमा पडिलें संचित । मापल्याचा वित्त नेम झाला ॥२॥ तुका म्हणे धणी ऐसा झालों आतां । करीन ते सत्ता माझी आहे ॥३॥