भजनी मालिका

भजने

सत्याक्षरें माझी वाणी । प्रवर्तली गुणीं तुमचिया ॥१॥ दाविले ते तुम्हीं अर्थ । वोळी यथार्थ मांडियेले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सदगुरु तोचि जाण । जो अपरोक्ष सांगे ज्ञान । देहत्रय निरसुन । परमपदीं ठेवी ॥१॥ जेणें देहत्रय निरसिलें । ज्ञान अग्नीमाजीं जाळिलें । अच्युतपद प्राप्त केलें । त्यासी वेळ नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सदा नामघोष करूं हरीकथा । तेणें सदा चित्ति समाधान ॥१॥ सर्वसुख ल्यालों सर्व अळंकार । आनंदें निर्भर डुल्लतसों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सदा नामें घडे आचार । नामें साधें सर्व विचार । नाम पवित्र परिकर । सादर वदनीं घेतां ॥१॥ शुद्ध वैराग्य घडे नामीं । तप तीर्थ घडे निष्कामीं । दान धर्म पुण्यपावन इये धर्मा । नाम वाचे आठवितां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सदा पैं परिपूर्ण जयाचें रुपडें । तेथेंचि माजीवडे मन करी ॥१॥ होईल उद्धार सुटेल संसार । सर्व मायापूर दुरी होय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी । पातकांचे होळी । होत तेणे केली ये ॥१॥ नको ध्यानधारणा आसन । वाचे सदा नारायण । केलिया ऐसा नेम जाण । मेरुसमान सुकृत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ