भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्त्व रज तम शुध्द सत्त्व चौथा

sattva raj tam shudhda sattva chautha

सत्त्व रज तम शुध्द सत्त्व चौथा । निर्गुणी गुणापरता बाईयानो ॥१॥ स्थूळ देह सूक्ष्म कारणाचे वरी । महाकारण सरी चौथा देह ॥२॥ कैवल्य देह तो ज्ञानदेवें पाहिला । पहाणें होऊनी ठेला चराचरी ॥३॥