भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं

sant pandharis jati | nirop dhadin taya hatin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥१॥ माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥ केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥२॥ तुमचे पायीं पायतान । मोचे माझे तन मन ॥३॥ तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥४॥ तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥५॥ लागती पादुका । ते मी तळील मृत्तिका ॥६॥ तुका म्हणे पंढरिनाथा। दुजें न धरावें सर्वथा ॥७॥