भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत हे कोण तरी देवाचे हे डोळे । पूजेविण आंधळे देवाचिये

sant he kon tari devache he dole | pujevin andhale devachiye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संत हे कोण तरी देवाचे हे डोळे । पूजेविण आंधळे देवाचिये ॥१॥ कोण्या नेत्रें देव पाहे तुजकडे । यासाठीं आवडे संत करी ॥२॥ संत ऐसे करी देवाचे कान । सांडियेल्या ध्यान कोण ऐके ॥३॥ संत पुससी तरी देवाचे ते पाय । आगमा न गमे सोय मागाडीये ॥४॥ संत पुससी तरी देवाचें तें पोट । धरूनियां बोट दाविती हरी ॥५॥ संत म्हणसी तरी देवाचा हा गळा । जेणें रस आगळा वेदादिकां ॥६॥ संतसरी पुससी तरी देवाचें वदन । माझें तें वचन संत झाले ॥७॥ परादिया चारी सांडूनि मीपणीं । संत झाले अंतरीं पडजीभ देवा ॥९॥ क्षरजे नासिलें अक्षर तें काढिलें । नि:शब्दाचें झालें बोले संत ॥१०॥ शब्द तो उडाला नाद तो बुडाला । भेद तो आटला माया भावीं ॥११॥ विठो वटावरीं पारविया झाले । केश ते वाढले माय संत ॥१२॥ कुरळ होऊनियां देती ते सुढाळ । म्हणे जनी वोवाळ जीवेंभावें ॥१३॥