भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत साधु जन जाणती या खुणा

sant sadhu jan janati ya khuna

रचनाकार: संत बोधले · अभंग
संत साधु जन जाणती या खुणा । एरवी पीसुणा काये सांगो ॥१॥ ऐसीया उपकाराच्या रासी । तुझ्या तू जाणसी । एन्हवी जनासी काये ठावे ॥ २॥ बोधला म्हणे या खुणा ठाउक्या भगतासी । धन्ये घेती त्यासी पांडुरंगु ॥३॥