भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत भेटती आजि मज

sant bhetati aji maj

संत भेटती आजि मज । तेणें जाला चतुर्भुज । दोन्ही भुजा स्थुळीं सहज । दोन्ही सूक्ष्मीं वाढल्या ॥१॥ आलिंगनीं सुख वाटे । प्रेम चिदानंदीं घोटे । हर्षे ब्रह्मांड उतटे । समुळ उठे मीपण ॥२॥ या संतासी भेटतां । हरे संसाराची व्यथा । पुढता पुढती माथां । अखंडित ठेवीन ॥३॥ या संतांचे देणें । कल्पतरुहूनि दुणें । परिसा परीस अगाध देणें । चिंतामणि ठेंगणा ॥४॥ या संतापरीस उदार । त्रिभुवनीं नाहीं थोर । मायबाप सहोदर । इष्टमित्र सोईरे ॥५॥ कृपाकटाक्षें न्याहाळिलें । आपुल्यापदीं बैसविलें । बापरखमादेविवरे विठ्ठलें । भक्तां दिधलें वरदान ॥६॥