भजनी मालिका

भजने

शिवरात्री कथा धन्य जे ऐकती । इच्छिलें पावती सर्व कांहीं ॥१॥ पातकाचा नाश पुण्य वाढे फार । शेखीं विश्वंभर कृपा करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिवादि वंदिती ज्याचे पायवणी । त्यासी पायांवरी न्हाणी यशोदा ते ॥१॥ नंद पुण्याचा लेखा न कळे आह्मांप्रती । शुक परीक्षिती सांगतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिव्या देतां यासी हांसतसे सुखें । न मानी कांहीं दु:खें नाम्यासाठीं ॥१॥ ऐसें येणें मोहिलें आमुचिया बाळा । हा कोठोनि काळा आला येथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिशुपाळादिकां कोठें शुद्ध भाव । उद्धरी केशव उंच नीच ॥१॥ काय कामा पुत्रा कोण आले जाणा । सेखीं त्या रावणा कैवल्यदानीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिष्यापासून सेवा घेणें । हें तो लक्षण अधमाचें ॥१॥ ऐसें असतीं गुरु बहु । नव्हेंचि साहुं भार त्यांचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥१॥ जाऊनि वोसंगा रिघे न वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शुक प्रल्हाद हरिच्या नामें । गातां सुखसंभ्रमें निवाले ॥१॥ त्यांनी उघडूनियां हे मागी । दाविली जगीं हरिभक्ती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

शुक म्हणे राया ऐक परीक्षिती । श्रवण करितां तृप्ति नाहीं तुज ॥१॥ माया जातां मथुरे सावध निद्रिस्थ । देखिला भग-चंत्त यशोदेनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षिती लाहो दिसां सातां ॥१॥ उठा उठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शुकादिक ज्याची वर्णिताती कीर्ति । तो ये काकुळती उद्धवासीं ॥१॥ दयेचा सामर बोले तयेवेळां । मजसाठी गोकुळा तुवां जावें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं । नाम पवित्र जगीं जपा आधीं ॥१॥ साधनें साधितां कष्ट होती जीवा । नाम सोपें सर्वां गोड गातां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शुकादिकाचिये ह्रदयीं ध्यान । आम्हां जोडलें वो न करितां साधन । सहजचि पाचारितां येतसे धांवोन । प्रेमें आलिंगितां निवें तनु मन वो ॥१॥ ऐशा गौळणी आनंद भरितां । दृष्टीं अवलोकूनि मदनचिया ताता । म्हणती धन्या भाग्य आमुचें वो आतां । लाधलों जन्म झाली कृताचि कृत्यता वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा