भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार

shivacha avatar | svami nivrutti datar

रचनाकार: संत सेना · अभंग
शिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥ तया माझा नमस्कार। वारंवार निरंतर ॥२॥ सव्य नांदे कैलासराणा । मागे गंगा ओघ जाणा ॥३॥ सेना घाली लोटांगण । वंदि निवृत्तिचे चरण ॥४॥