भजनी मालिका
← भजनांकडे परत

शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा

shital sauli amuchi mauli | vithai volali premapanha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥१॥ जाऊनि वोसंगा रिघे न वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥ कृपा तनु माझी सांभाळी दुभोनि । अमृतसंजीवनी लोटलीसे ॥२॥ आनंदाचा ठाव नाहीं माझे चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥३॥ सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आसे ॥४॥ तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाईचें ॥५॥