भजनी मालिका

भजने

शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥ दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥१॥ जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

शिव ऐसा मंत्र सुलभ सोपा रे । जपावा परिकर नित्य नेमें ॥१॥ न बाधिच विघ्न संसाराचें भान । धन्य तें भजन शिवनामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिव ऐसा शब्द कल्याणदायक । जाणती भाविक साधुजन ॥१॥ तारक हें नाम भोळ्याभाविकांसी । नेणते जाणत्यांसी लाभ एक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव एक । जे निराकार सम्यक विठ्ठल माझा ॥१॥ विठ्ठल नामाचा महिमा अगाध । होणे पुर्ण बोध ऐशा परी ॥२॥

रचनाकार: संत सावता

शिव शिव नाम वदतां वाचे । नासे पातक बहुतां जन्माचें ॥१॥ जो मुकुटमणी निका वैष्णव । तयाचें नाम घेतां हरे काळांचें भेव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिवणें टिपणें करोनि आपुलें । नित्य चालवणें संसारिक ॥१॥ गणगोतांमाजीं बरें केलेंज नांव । माझें सत्त्व सर्व बुडविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिवनाम उच्चारी । आळस न करी क्षणभरी । महापापा होय बोहरी । नाम घेतां ॥१॥ शिव शिव नाम । जपे कां रे उत्तम । तेणें नासे भवभ्रम । निःसंदेह ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिवनामाची कावड खांदीं । आम्हीं घेतली समताबुद्धि ॥१॥ हर हर हर वोळंगा रे भाई । आशा मनिशा तृष्णा सांडुनी पाही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिवरात्र व्रत करी यथाविधी । भावें पूजी आधीं शिवलिंग ॥१॥ चुकलें चुकलें जन्माचें बंधन । पुनरागमन नये तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ