भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिशुपाळादिकां कोठें शुद्ध भाव । उद्धरी केशव उंच नीच

shishupaladikan kothen shuddha bhav | uddhari keshav unch nich

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शिशुपाळादिकां कोठें शुद्ध भाव । उद्धरी केशव उंच नीच ॥१॥ काय कामा पुत्रा कोण आले जाणा । सेखीं त्या रावणा कैवल्यदानीं ॥२॥ महादुष्ट शंखासुरें नेले वेद । शेवटीं गोविंदें सोडविलें ॥३॥ पित्याचिये हातीं पुत्र वध करी । कृपाळु बा हरीं नामा ह्मणे ॥४॥