भजनी मालिका

भजने

शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान । दर्पणींचें धन उपर वाया ॥१॥ अनुभव कइं होईंन भोगिता । सांकडें तें आतां हें चि आलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता । कां आम्हां अनाथा कष्टवितो ॥१॥ जन्मोनियां आमुची पुरविली पाठी । मोडिली राहाटी संसाराची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता । कां आम्हां अनाथा कष्टवितो ||१|| न्मोनियां आमुची पुरविली पाटी मोडिली राहाटी संसाराची ॥२॥

रचनाकार: संत राजाई

शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥ प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तूं जाण श्रुतिदास ॥१॥ त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शिणले ते वेद श्रुती पैं भांडती पुराणांची मती कुंठीत जाहली ॥१॥ तो हा पांडुरंग उभा विटेवरी । पाउले साजिरी समचि दोन्ही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥ अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुम्हांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शिणल्या भरल्या विठोबाचें नाम । विश्रांतीचें धाम पंढरपुर ॥१॥ म्हणोनियां करा नामाचाचि लाहो । पंढरीचा नाही पहा डोळां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ