भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिवादि वंदिती ज्याचे पायवणी । त्यासी पायांवरी न्हाणी यशोदा ते

shivadi vanditi jyache payavani | tyasi payanvari nhani yashoda te

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शिवादि वंदिती ज्याचे पायवणी । त्यासी पायांवरी न्हाणी यशोदा ते ॥१॥ नंद पुण्याचा लेखा न कळे आह्मांप्रती । शुक परीक्षिती सांगतसे ॥२॥ सनकादिक ज्याचे ध्यानीं झाले पिसे । गायी चारीतसे गोकुळांत ॥३॥ गडियांसी काला वांटीत्त श्रीधर । कौतुक सुरवर पाहताती ॥४॥ नामा ह्मणे सुख देईल भक्तांसी । वधील दुष्टांसी स्वामी माझा ॥५॥