भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल

shikavuni bol | kelen kavatuk naval

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥१॥ आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥ हातीं प्रेमाचें भातुकें । आम्हां देऊनियां निकें ॥२॥ तुका करी टाहो । पाहे रखुमाईचा नाहो ॥३॥