भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिणले ते वेद श्रुती पैं भांडती पुराणांची मती कुंठीत जाहली

shinale te ved shruti pain bhandati purananchi mati kunthit jahali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिणले ते वेद श्रुती पैं भांडती पुराणांची मती कुंठीत जाहली ॥१॥ तो हा पांडुरंग उभा विटेवरी । पाउले साजिरी समचि दोन्ही ॥२॥ कर कटावरीं तुळशीच्या माळा ।निढळीं शोभला मुकुट तो ॥३॥ एका जनार्दनीं गोजिरें तें ठाण । शोभलें जघन करयुगुली ॥४॥