भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिणसी कां रे वायां । वाचे वदे पंढरीराया

shinasi kan re vayan | vache vade pandhariraya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिणसी कां रे वायां । वाचे वदे पंढरीराया ॥१॥ मग तुज नाहीं रे बंधन । पारुषे पां कर्माकर्म ॥२॥ कर्म धर्म न करी तूं सोस । अवघा विठ्ठलचि देख ॥३॥ नको करूं कुंथाकुंथी । तेणें होते फजिती ॥४॥ अनुभव घेई देखा । एका जनार्दनीं सुखा ॥५॥