भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता । कां आम्हां अनाथा कष्टवितो

shikava ho rukmai apuliya kanta | kan amhan anatha kashtavito

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता । कां आम्हां अनाथा कष्टवितो ॥१॥ जन्मोनियां आमुची पुरविली पाठी । मोडिली राहाटी संसाराची ॥२॥ आतां आम्ही काय करणें माउलिये । बैसूं सावलिये कवणाचिये ॥३॥ माझ्या भ्रतारासी लावियेला चाळा । श्रण जी वेगळा न करी त्यासी ॥४॥ आमुचा वेव्हार विध्वंसिला पाहींज । करुणा माझी कांहीं न ये त्यासी ॥५॥ सकळाचें मूळ आपणा आधीन । केलें येणें जाणें पांडुरंगें ॥६॥ आपुलें परावें मोहो हा सांडिला । आंगोठा मोडिला उपाधीचा ॥७॥ उघडें घरदार लौकिक वेव्हार । धरिला निर्धार याचे नामीं ॥८॥ रात्रंदिवस जपे गोविंद ह्रदयीं । आमुची चिंता कांहीं नलगे त्यासी ॥९॥ तुमचे सन्निधानें जालों आम्ही दीन । न वाटे विर्वाण कैसें तुम्हां ॥१०॥ संसाराचि व्यथा नेणवे सर्वथा । होय तें उचिता करणें आम्हां ॥११॥ धरी निरंतर एकचि उत्तर । परि ह तुम्ही विचार काय केलाअ ॥१२॥ अनुभव अनुभवीं जाणें तुम्हीं समर्थपणें । सदासुखीं म्हणे नामीं तुझ्या ॥१३॥ जन्मोनि अवघी तुमचीं पोसणीं । नेणो तुम्हांवांचोनि कोणी दुजें ॥१४॥ कायावाचामनें तुमचिये पाईं । विनविते राजाई जिवलगा ॥१५॥