भजनी मालिका

भजने

शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें । म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥ आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला । पुढें तेणें उभविला दुजा एकू ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें। म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥ आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला पुढे तेणें उमविला दुजा एकू ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

शरीर हें स्थळ मळानिर्मळाचें मूळ । पाहोनि चोखाळ आदिपुरुषासी । जन्म मरणाचिया उचलुनि पेडी । मग तया बिंबडीं ज्ञान पिके ॥१॥

शरीराचा भाव तुज नाहीं देवा । तेथें मी केशवा काय बोलूं ॥१॥ अंगदाचे अंगीं बळ देसी फार । बहु उपकार कळों आलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शहाणा तो जाण रे । उद्धवा आत्मत्वें पाहें रे । नेणता तो जाण रे । उद्धवा देहबुद्धीस वाहे रे ॥१॥ उद्धव म्हणे कान्होबा सांग रे । गोडा गोडा गोष्टी स्वभाव रे । निज गोडा गोष्टी ऐकतां । चित्त चैतन्य फांवे रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शहाणा हो म्हणविती । हरिभक्ति कां रे वरवर करिती ॥१॥ उगीच कासया करसील फड । जग हें बोधावया बापुडें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शहाणे तेचि परस्त्रीपाशीं । क्षणहि सहवासीं न बैसती ॥१॥ येती जाती तरी ते दुरी । चौघाभीतरी त्याचिसवें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

शहाणें शोधितां नसे । दुष्काळ पडिला असे तया धुंडितसे मन माझें रे आहेति थोर थोर। परि नाहीं चतुर । तेथें निरंतर मन माझें रे

रचनाकार: संत रामदास

शाकार भारे मस्तकीं वाहिले । घर शाकारिलें नामयाचें ॥१॥ दामशेटी पुसे कोठील तूं कोण । येरु म्हणे जाण वस्ती येथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शांति भीमातीरीं भक्ति पंढरपुरीं । प्रेम विटेवरी देखि-यलें ॥१॥ देखिलागे माय देखिलागे माय । देखिलागे मय पंधरीये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव