भजनी मालिका

भजने

वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका॥१॥ तार्किकाचे अंग आपणा पारिखें । माजि†यासारिखें वाईचाळे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वेदध्वनि केलिया मुनी । गंधर्वगायनें होती गगनीं । ब्रह्मादिक इंद्र विमानीं । इंद्रायणी ज्ञानदेवी ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

वेदपरायण मनीं तो ब्राम्हण । चित्त समाधान संतुष्ट सदा ॥१॥ येरा माझें नमन सर्वसाधारण । ग्रंथाचें राखण म्हणोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥१॥ तुझीं वर्में तूं चि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वेदवचनें सुतक पावे । ब्रह्मा म्हणतां ब्रह्म नव्हें ॥१॥ वेद न कळेंचि साचार । देहबुद्धिं अविचार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदविधि कांही न कळे पाठका । गुणदोष देखा मलीन सदा ॥१॥ दशग्रंथीं ज्ञान होतांचि जाण । निंदितो देखोन भलत्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदविहित तुम्ही आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥१॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वेदशास्त्र पुराणें अनेक शब्दज्ञानें । भारताचे श्रवणे सर्वस्व जोडे ॥१॥ ते सव्वालक्ष भारत जोडे पैं सुकृत । तेंचि गीते सात शतें प्राप्त होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदशास्त्र वक्ता अति निःसीम पाही । सिद्धान्त बोलतां उरीं ठेवी कांहीं । लयलक्ष ध्यान मुद्रा दावी आपुलें ठायीं । वेडे वेडे चार करितां मोक्ष न ये हातां ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदशास्त्रीं गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरीं ॥१॥ तेणें माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळोवेळीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदां जन्मस्थान शास्त्रां समाधान । काय बुझावण दाखविसी ॥१॥ जगादि अनंत अवतार घेसी । चरित्रें दाविसी भक्तांपुढें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदां नकळे पार श्रुतीं अगोचर । उपनिषदां सार न-कळेचि ॥१॥ तो हरि गोकुळीं वसुदेवा कुळीं । यशोदेजवळी बाळ-कृष्ण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥१॥ खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम