भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन एक नारायण सार जप

vedashastra praman shrutichen vachan ek narayan sar jap

वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन एक नारायण सार जप ॥१॥ जप तप कर्म हरिविण धर्म । वाऊगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ हरिपाठें गेलें ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमन-कळिके ॥३॥ ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमे कुळ गोत्र वर्जियेलें ॥४॥