भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां

vedacha to artha amhansi cha thava | yeranni vahava bhar mathan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥१॥ खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥ उत्पित्तपाळणसंहाराचें निज । जेणें नेलें बीज त्याचे हातीं ॥२॥ तुका म्हणे आम्हा सापडले मूळ । आपणची आले हाती ॥३॥