भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें

vedapurush tari neti kan vachan | nivaduni bhinna dakhavilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥१॥ तुझीं वर्में तूं चि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ध्रु.॥ यज्ञाचा भोक्ता तरि कां नव्हे सांग । उणें पडतां अंग क्षोभ घडे ॥२॥ वससी तूं या भूतांचे अंतरीं । तरि कां भेद हरी दावियेला ॥३॥ तपतिर्थाटणें तुझे मूर्तीदान । तरि कां अभिमान आड येतो ॥४॥ आतां क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनियां हाका उभा द्वारीं ॥५॥