भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदवक्ता नारायण

vedavakta narayan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वेदवक्ता नारायण । तोचि तो आपण सर्वदृष्टा ॥१॥ वदवी सेवकाची वाणी । आपुल्या गुणी प्रवर्तपुनी ॥२॥ परम गुह्यार्थ् तोचि प्रगटी । आपण पोटीं संचारोनी ॥३॥ निळा म्हणे विठ्ठल हरी । वक्ता वैखरी तो वाचा ॥४॥