भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदवचनें सुतक पावे । ब्रह्मा म्हणतां ब्रह्म नव्हें

vedavachanen sutak pave | brahma mhanatan brahma navhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदवचनें सुतक पावे । ब्रह्मा म्हणतां ब्रह्म नव्हें ॥१॥ वेद न कळेंचि साचार । देहबुद्धिं अविचार ॥२॥ सकळ ब्रह्मा पैं अद्वैत । वेद परीसोनी ना तुटे द्वैत ॥३॥ श्रुति सांगती परमार्था । हिंसा न करावी सर्वथा ॥४॥ संकल्प नाशी तो संन्यासी । तेथें तों कल्पना कायसी ॥५॥