भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका

ved shastra nahin puran praman | tayachen vadan navaloka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका॥१॥ तार्किकाचे अंग आपणा पारिखें । माजि†यासारिखें वाईचाळे ॥ध्रु.॥ माता निंदी तया कोण तो आधार । भंगलें खापर याच नावें ॥२॥ तुका म्हणे आडराणें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥३॥