भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदां नकळे पार श्रुतीं अगोचर । उपनिषदां सार न-कळेचि

vedan nakale par shrutin agochar | upanishadan sar na-kalechi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेदां नकळे पार श्रुतीं अगोचर । उपनिषदां सार न-कळेचि ॥१॥ तो हरि गोकुळीं वसुदेवा कुळीं । यशोदेजवळी बाळ-कृष्ण ॥२॥ ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती । शास्त्रांसी तों गति न कळेचि ॥३॥ योग्यांचें चिंतन मुनींचें अंजन । शेषादिकां ध्यान सदा ज्याचें ॥४॥ पुराणें भागलीं आचारें श्रमलीं । बोलतां राहिलीं साधुवृंदें ॥५॥ नामा ह्मणे तो हा विठठल पंढरी । नाम मात्रें तारी सकळांसी ॥६॥