भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदविधि कांही न कळे पाठका । गुणदोष देखा मलीन सदा

vedavidhi kanhi na kale pathaka | gunadosh dekha malin sada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदविधि कांही न कळे पाठका । गुणदोष देखा मलीन सदा ॥१॥ दशग्रंथीं ज्ञान होतांचि जाण । निंदितो देखोन भलत्यासी ॥२॥ सर्व ब्रह्मरुप ऐसें बोले वेद । तेथें वादावाद उरला नाहीं ॥३॥ ओऽहं सोऽहं कोऽहं नाहीं ठाव । उगेचि गौरव मिरवी ज्ञान ॥४॥ एका जनार्दनीं ब्रह्माज्ञानासाठीं । हिंडताती कोटी जन्म घेत ॥५॥