भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदशास्त्र वक्ता अति निःसीम पाही । सिद्धान्त बोलतां उरीं ठेवी कांहीं

vedashastra vakta ati nihsim pahi | siddhanta bolatan urin thevi kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदशास्त्र वक्ता अति निःसीम पाही । सिद्धान्त बोलतां उरीं ठेवी कांहीं । लयलक्ष ध्यान मुद्रा दावी आपुलें ठायीं । वेडे वेडे चार करितां मोक्ष न ये हातां ॥१॥ तो खूण वेगळी विरळा जाणें एक । जाणीव ग्रासोनी त्यासी बाणे देख ॥ध्रु०॥ अष्टांग योग जाणे मंत्र तंत्र कळा । प्रबोध भक्तीनें वश्य सिद्धि सकळा । वर्म चुकला भाग्यहीन अंधळा । मी कोण हेंचि नेणें कळ त्या विकळा ॥२॥ सिद्धान्त एक निका सावध ऐका । सुखासी मेळवितें वर्म नातुडे फुका । भाव धरुनी संतापायीं नाम वोळखा । तैंचे एका जनार्दनीं भेटी देखा ॥३॥