भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेडें वांकुडें बोलिलें । निळा पाहिजे उपसाहिलें

veden vankuden bolilen | nila pahije upasahilen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वेडें वांकुडें बोलिलें । निळा पाहिजे उपसाहिलें ॥१॥ देवा तुम्ही रमाकांत । भक्त तुमचे चरणांकित ॥२॥ सूर्य जेवीं नव्हे किरण । सागर लहरीं तो समान ॥३॥ निळा म्हणे तूं व्यापक । भक्त एकदेशी क्षुल्लक ॥४॥