भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेडें वांकुडें गाईन । परि मी तुझा चि म्हणवीन

veden vankuden gain | pari mi tujha chi mhanavin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेडें वांकुडें गाईन । परि मी तुझा चि म्हणवीन ॥१॥ मज तारीं दिनानाथा । ब्रीदें साच करीं आता ॥ध्रु.॥ केल्या अपराधांच्या राशीं । म्हणऊनि आलों तुजपाशीं ॥२॥ तुका म्हणे मज तारीं । सांडीं ब्रीद नाहींतरी ॥३॥