भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद तो प्रमाण । वचन करी जो अप्रमाण

ved to praman | vachan kari jo apraman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेद तो प्रमाण । वचन करी जो अप्रमाण ॥१॥ तो स्वहिता नाडला । जन्मोजन्मीं कुडा जहाला ॥२॥ वेदाची जे मर्यादा । नायकेचि जो कदा ॥३॥ वेदें सांगतिलें कर्म । करी सदा तो अधर्म ॥४॥ जन्मतांचि प्राणी । एका जनार्दनीं वांझ जनीं ॥५॥