भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेणुनादीं चरे पाणी पी भीवरे । ते धेनु हूंबरे वत्सांलागीं

venunadin chare pani pi bhivare | te dhenu humbare vatsanlagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेणुनादीं चरे पाणी पी भीवरे । ते धेनु हूंबरे वत्सांलागीं ॥१॥ वाणें ते सांवळी नामें ते श्रीधरा । चरे वसुंधरा चवदा भुवनें ॥२॥ केशव नामें गाय माधव नामें गाय । विठ्ठल नामें गाय कामधेनु ॥३॥ प्रेमें ते पान्हावे भक्ता घरीं जाय । भूकेलिया खाय पातकासी ॥४॥ नामा म्हणे गाय भाग्यवंता घरीं । पाप्या जन्मवरी पाठीलागे ॥५॥