भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद जया गाती । आम्हां तयाची संगति

ved jaya gati | amhan tayachi sangati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेद जया गाती । आम्हां तयाची संगति ॥१॥ नाम धरियेलें कंठीं । अवघा सांटविला पोटीं ॥ध्रु.॥ ॐकाराचें बीज । हातीं आमुचे तें निज ॥२॥ तुका म्हणे बहु मोटें । अणुरणियां धाकुटें ॥३॥