भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारंवार किती करूं करकर । माझा तंव आधार खुंटलासे

varanvar kiti karun karakar | majha tanv adhar khuntalase

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
वारंवार किती करूं करकर । माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥ न बोलावें आतां हेंचि शहाणपण । होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥ केव्हां तरी तुम्हां होईल आठवणे । हाचि एक भाव धरूं आतां ॥३॥ चोखा म्हणे मग येशील गिवसित । तोंवरी चित्त दृढ करूं ॥४॥