भजनी मालिका
← भजनांकडे परत

वायुनें वळावें धूमें मिळावें अभ्रें

vayunen valaven dhumen milaven abhren

वायुनें वळावें धूमें मिळावें अभ्रें पाणिये गळावें । आकाश पोकळ म्हणौनि क्षोभा जाऊं नये । निज चेईलया केउतें पळावे रया ॥१॥ निराळ निराळ सहज तें निराळ । तें क्षीरचातका दुभे ॥ एक धरुनियेरे सकळिक वावो । मा काय काय तेथें नलभे रया ॥२॥ स्तन ना वाहे जयाचिये माये । तें बाळक केहीं न धायेरेरे । दृष्टी वोळलें तेंचि क्षीर जालें । कासाविचें गोत्र पाहेरेरे ॥३॥ केळि पोकळ ह्मणोनि सांडिसील झणें । तरी फ़ळवरी निवांत राहेरेरे । नाहीं नाहीं म्हणोनि थरारिसि झणें नाहीं तें तेथेंचि पाहीरेरे ॥४॥ रत्नाचिया आशा घात जाला तया राजहंसा ॥ झणें भुलों नको ते सारेरे ॥ द्रोणाचेनि नावें मातिये सळ चढे । होई त्या कोळिया ऐसारेरे ॥५॥ बापरखुमादेविवरु ह्रदयींचा जागता । सांडुनि अनु सुखाची कायसी चाड । सिध्दचि सांडुनी अनेआन जल्पसी तरि सहजचि पडिलेंसी द्वार रया ॥६॥